पोस्ट्स

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला

सांगा निरोप माझा त्या माता माऊली हरणीला कसं सांगू तुला येडामाय आई गं तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला ||धृ|| सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळतं कुणासाठी ढळतं फक्त तुझी तुला कळतं दुःख सांगू कुणाला बोल भोळ्या ग मनाला ||1||  तुझ्यासाठी येडामाई किती तळमळावं धडधड करतं काळीज तुला हे कळावं भक्तीची भुकेली मी आले तुझ्या दाराला ||2|| नाव तुझं येडामाई सदा गं ओठातं  तुझ्यासाठी लागली आग काळजाच्या देठात ह्रदय भरून आलं गं बोल प्रसादाला ||2||                             || समाप्त ||  

गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची Gadi ghungrachi Ali thorlya bhayachi

इमेज
  लगबग लगबग माझ्या रायाची  गड जेजुरी जायाची  गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची  सासू ग सासरा प्रेम आई बापा वानी घरामधे सुखी मी गं राजाची त्या राणी घरी ननंद माझी मोठी मायाची  गड जेजुरी जायाची ||1|| करुनी तयारी बाई बांधलं गटूड  धाकला दीर गाडी हाकतोया पुढं  हाऊस मल्हारी चा गड पाह्याची  गड जेजुरी जायाची ||2|| जाऊनी रावळी धरिल मल्हारीचे पायी  गळ्यामध्ये भंडारा विलास गाणं गाई  आवड मल्हारीचे गीत गायाची  गड जेजुरी जायाची ||3||                    || समाप्त ||

नथ मोत्याची नाकामधी गं आंबा सवारी शिवाजी चौकामदी lyrics

इमेज
 आंबा कलुळाचं पाणी गं आंबा पाणी कशानं लाली लाल गं लाली लाल कुणी पाया खांदीयेला खांदिला  कोण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला ||1|| आदेश भारती बुवाचा गं बुवाचा द्यावा गिलावा कुंकवाचा गं कुंकवाचा ||2|| बसली न्हायाला चमके हिरा गं हिरा गायमुखाला फुटला झरा गं फुटला झरा ||3|| चंदन उठनं पाटाखाली गं खाली  केस वाळवी घाटाखाली गं घाटाखाली ||4|| नथ मोत्याची नाकामधी गं आंबा सवारी शिवाजी चौकामधी गं चौकामधी ||5|| आरोळी भोप्याची गुरावाणी गं आंबा आली पळत वाऱ्यावाणी गं वाऱ्यावाणी ||6|| आली गाभार्‍यात धड-धड गं आंबा होंबा मधून आली पुढं गं आली पुढं ||7|| रावळी झाली दानादीन दानादिन आरती ओवाळी आराधीन गं आरादीन ||8|| सांगे वामन गोंधळी गं गोंधळी बसली साजनाच्या गळी गं साजन च्या गळी ||9||                    || समाप्त ||

लखाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला

इमेज
  लखाबाई भेट दे मला माझी शपथ गं तुला  जिव लागलाय माझा झुरनीला  जीव लागलाय माझा झुरनीला सोडून गेली का ग मला वनाला तळमळ जीवाची या सांगू कुणाला स्वार्थ नडला या मला जागा मिळो चरणाला  ||1|| चुकी बाळाची माफ करावी सुखाच्या मदनानं झोळी भरावी सावरून ने मला काय मागु मी तुला ||2|| भक्तिभावाने आलो तुला शरणं नाव तुझे घेता घेता याव मरणं रूप दाव सोनुला गुरु चंदन मला ||3||               || समाप्त ||

DJ वाल्या भाव येडामाईचं गाणं लाव lyrics

इमेज
  डिजेवाल्या भाव मराठी lyrics नाचुद्या मला  घुमूद्या मला  बघूद्या सारा गाव Dj वाल्या भाव येडामाईचं गाणं लाव ||धृ|| हळद साखरपुडा न लगीन बड्डे बी चालूद्या येडामाईच्या गाण्यावरती धींगाना घालूद्या येडुच्या कृपेनं तुझ रं दादा होईल आता नाव ||1|| नाचता - नाचता राहीना भान पोरांना पोरिंना मारुन ऊड्या आठवती त्या येडसरीला  तरूण पिढीच्या मनात सुध्दा रूजला भक्ती भाव ||2|| भैयाला व्यंक्याला नाचाया ओढलं छोट्यान गोट्यानं साजन बेंद्रे गातोय सोड की आवाज मोठ्यानं क्लासीक वाल्यांनी औंदाच्या वर्षी मूद्दाम केला डाव ||3||                           || End ||

आठवण येता तुझी माय येडामाय

इमेज
  आठवण येता तुझी माय येडामाय अचानक काळजात दुखलं काय माझ्याकडुन चुकलं फुल गुलाबाचं सुकलं  आठवण येता तुझी माय गं येडामाय अचानक काळजात दुखलं  ||धृ|| भक्तीची माझ्या आई राखावी गं जान आशान येडु माझा निघुन जाईल प्राण सरनार नाही इतकं दीलं मला दान  भेट मला दे गं तुला बाळाची या आण का ग लेकराला माय वाऱ्यावाणी तु फुकलं ||1|| विसरून जाऊ कसा शब्द गोड-गोड तुझ्या भेटीची माझ्या मनामध्ये ओढ निष्ठुर होऊ नको अशी एक मोड  तुझ्या मायेला नाही जगामध्ये तोड  आता तरी भेट दे गं वाट पाहोणी मन थकलं ||2|| तळमळुन बोलतो मी तुला बावन्न खोडे  गुन तुझ गाईल मी किती-कीती वेडे ओंकार मनाचं सोडव हे कोडे जन्मास घाल पुन्हा संतोष धेडे गाणं अर्जुनाच गाऊन साजननं सारं जींकलं ||3||                     || समाप्त ||

आराधी गण नमन

इमेज
  अंबाबाई तुला वंदना अर्पोनिया सुमना शिव गौरीच्या गणा  तोडोनिया भव बंधना अंबाबाई तुला वंदना येडामाई तुला वंदना ||धृ|| पा हीले नमन गणपतीला  गणपतीच्या शारदेला तोडोनिया भव बंधना ||1|| दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला तोडोनिया भव बंधना ||2|| तिसरे नमन खंडोबाला  खंडोबाच्या म्हाळसाईला तोडोनीया भव बंधना ||3||         || समाप्त ||