आराधी गण नमन

 अंबाबाई तुला वंदना





अर्पोनिया सुमना शिव गौरीच्या गणा 

तोडोनिया भव बंधना

अंबाबाई तुला वंदना

येडामाई तुला वंदना ||धृ||


पाहीले नमन गणपतीला 

गणपतीच्या शारदेला

तोडोनिया भव बंधना ||1||


दुसरे नमन शंकराला

शंकराच्या पार्वतीला

तोडोनिया भव बंधना ||2||


तिसरे नमन खंडोबाला 

खंडोबाच्या म्हाळसाईला

तोडोनीया भव बंधना ||3||


        || समाप्त ||

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवण येता तुझी माय येडामाय

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला