आठवण येता तुझी माय येडामाय

 आठवण येता तुझी माय येडामाय अचानक काळजात दुखलं



काय माझ्याकडुन चुकलं फुल गुलाबाचं सुकलं 

आठवण येता तुझी माय गं येडामाय अचानक काळजात दुखलं ||धृ||


भक्तीची माझ्या आई राखावी गं जान

आशान येडु माझा निघुन जाईल प्राण

सरनार नाही इतकं दीलं मला दान 

भेट मला दे गं तुला बाळाची या आण

का ग लेकराला माय वाऱ्यावाणी तु फुकलं ||1||


विसरून जाऊ कसा शब्द गोड-गोड

तुझ्या भेटीची माझ्या मनामध्ये ओढ

निष्ठुर होऊ नको अशी एक मोड 

तुझ्या मायेला नाही जगामध्ये तोड 

आता तरी भेट दे गं वाट पाहोणी मन थकलं ||2||


तळमळुन बोलतो मी तुला बावन्न खोडे 

गुन तुझ गाईल मी किती-कीती वेडे

ओंकार मनाचं सोडव हे कोडे

जन्मास घाल पुन्हा संतोष धेडे

गाणं अर्जुनाच गाऊन साजननं सारं जींकलं ||3||


                    || समाप्त ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आराधी गण नमन

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला