नथ मोत्याची नाकामधी गं आंबा सवारी शिवाजी चौकामदी lyrics





 आंबा कलुळाचं पाणी गं आंबा पाणी कशानं लाली लाल गं लाली लाल

कुणी पाया खांदीयेला खांदिला 

कोण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला ||1||


आदेश भारती बुवाचा गं बुवाचा

द्यावा गिलावा कुंकवाचा गं कुंकवाचा ||2||


बसली न्हायाला चमके हिरा गं हिरा

गायमुखाला फुटला झरा गं फुटला झरा ||3||


चंदन उठनं पाटाखाली गं खाली 

केस वाळवी घाटाखाली गं घाटाखाली ||4||


नथ मोत्याची नाकामधी गं आंबा

सवारी शिवाजी चौकामधी गं चौकामधी ||5||


आरोळी भोप्याची गुरावाणी गं आंबा

आली पळत वाऱ्यावाणी गं वाऱ्यावाणी ||6||


आली गाभार्‍यात धड-धड गं आंबा

होंबा मधून आली पुढं गं आली पुढं ||7||


रावळी झाली दानादीन दानादिन

आरती ओवाळी आराधीन गं आरादीन ||8||


सांगे वामन गोंधळी गं गोंधळी

बसली साजनाच्या गळी गं साजन च्या गळी ||9||

                   || समाप्त ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवण येता तुझी माय येडामाय

आराधी गण नमन

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला