गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची Gadi ghungrachi Ali thorlya bhayachi

 


लगबग लगबग माझ्या रायाची

 गड जेजुरी जायाची

 गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची 


सासू ग सासरा प्रेम आई बापा वानी

घरामधे सुखी मी गं राजाची त्या राणी

घरी ननंद माझी मोठी मायाची

 गड जेजुरी जायाची ||1||


करुनी तयारी बाई बांधलं गटूड

 धाकला दीर गाडी हाकतोया पुढं 

हाऊस मल्हारी चा गड पाह्याची

 गड जेजुरी जायाची ||2||


जाऊनी रावळी धरिल मल्हारीचे पायी 

गळ्यामध्ये भंडारा विलास गाणं गाई

 आवड मल्हारीचे गीत गायाची

 गड जेजुरी जायाची ||3||

                   || समाप्त ||

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवण येता तुझी माय येडामाय

आराधी गण नमन

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला