पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला

सांगा निरोप माझा त्या माता माऊली हरणीला कसं सांगू तुला येडामाय आई गं तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला ||धृ|| सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळतं कुणासाठी ढळतं फक्त तुझी तुला कळतं दुःख सांगू कुणाला बोल भोळ्या ग मनाला ||1||  तुझ्यासाठी येडामाई किती तळमळावं धडधड करतं काळीज तुला हे कळावं भक्तीची भुकेली मी आले तुझ्या दाराला ||2|| नाव तुझं येडामाई सदा गं ओठातं  तुझ्यासाठी लागली आग काळजाच्या देठात ह्रदय भरून आलं गं बोल प्रसादाला ||2||                             || समाप्त ||